मंत्रालयातून बोलत असल्याचे सांगून तो व्यापाऱ्यांना घालतो गंडा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी मंत्रालयातल्या सीएम ऑफिसमधून बोलतोय असे सांगून मुंबई, नवी मुंबईतील व्यांपाऱयांकडून तो पाहिजे ते घ्यायचा. मग इंटरनेट बँकिगद्वारे पैसे पाठविल्याचा मेसेज संबंधितांना पाठवून फसवणूक करायचा. लॅमिन्टन रोड येथील एका व्यापाऱयाला देखील त्योने असाच गंडा घातला होता, मात्र डी.बी.मार्ग पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळून फसवणूक केलेला मुद्देमाल हस्तगत केला.

लॅमिन्टर रोड येथील एका दुकानमालकाने त्याची सीएम ऑफिसमधून बोलतोय असे सांगून एकाने ऍपल मोबाईल व लॅपटॉप असा 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेऊन त्यामोबदल्यात पैसे न देता फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच डॉ. डी.बी.मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजा बिडकर, उपनिरीक्षक संकल्प मोकल, वसिम पटेल, तसेच गावंड, जाधव या पथकाने तपास केला आणि आरोपी भालिंदर पाल सिंग याला खारघर येथे जाऊन पकडले. त्याच्याकडून एक लॅपटॉप हस्तगत करण्यात आला.

निवृत्त नौदल कर्मचाऱ्यांच्या घरात राहून झोल

भालिंदर हा खारघर येथे एका निवृत्त नौदल कर्मचाऱयाच्या घरात भाडेतत्वावर राहत होता. तो विविध कंपन्यांचे सिम कार्ड वापरून व्यापाऱयांना फोन करायचा आणि मंत्रालयातील सीएम ऑफिसातून बोलत असल्याचे सांगून पाहिजे ते खरेदी करायचा. त्यानंतर तो बोगस सीम कार्डवरून इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे पाठविल्याचा मेसेज पाठवून फसवणूक करायचा.