रेकॉर्डब्रेक थंडी! तापमानाचा आकडा ऐकूनच दिल्लीकरांची दातखीळ बसली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
delhi-winter-passenger

राजधानी दिल्लीमध्ये थंडीचा पारा आणखीनच घसरला आहे. दिल्लीमध्ये शनिवारी पहाटे किमान तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे.

delhi-winter-lady

शनिवारी पहाटे दिल्लीमध्ये तापमान 2.4 डिग्री सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं आहे. गेल्या 14 दिवसांपासून दिल्लीतील तापमान सलग घसरत असून येत्या काही दिवसात पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे.

delhi-winter-tea-stall

अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे बुधवारी सकाळी दिल्लीमध्ये 5.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. म्हणजेच तीन दिवसांत पारा तब्बल 3 अंशांनी घसरला आहे.

delhi-winter-crowd-at-teast

गेल्या 22 वर्षामध्ये डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच राजधानीमध्ये सलग 14 दिवस एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

shekoti-in-delhi

याआधी 1997 मध्ये सलग 13 दिवस दिल्लीकरांना कुडकुडत काढावे लागले होते. 2019 मध्ये हा विक्रम मोडला असून यंदा सलग 14 दिवस दिल्लीकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

delhi-winter-river

पाच वर्षांपूर्वी म्हणजेट 2014 साली थंडीचा कहर सलग 8 दिवस सहन करावा लागला होता.

delhi-winter-traffic

दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद आणि गुरुग्राम इथे थंडीमुळे जनजीवन गारठले आहे. थंडीसोबत दाट धुकेही पडत असल्याने याचा परिणाम रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर होण्याची दाट शक्यता आहे.

delhi-winter-morning-walk