
केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत पारित केला आहे. त्यामुळे देशभरात चांगलाच गदारोळ निर्माण झाला असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाले आहेत. तसेच काही ठिकाणी आंदोलनावेळी काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. हे अराजक असल्याची टीका ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे. तसेच आता प्रत्येक दिल्लीवाल्याची भिती वाटते असे वक्तव्य सुप्रसिद्ध गीतकार गुलझार यांनी केले आहे.
एका कार्यक्रमात भालचंद्र नेमाडे आणि गुलझार हे एका व्यासपीठावर होते. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना नेमाडे म्हणाले की, “देशात जे सुरू आहे ते अराजकतेचे लक्षण आहे. आपली वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने सुरू आहे. आपल्या देशात अशी हिंसक परिस्थिती कधीच नव्हती.” हे वाढत जाणार असून आपल्याला यातून बाहेर पडणे कठीण असल्याचेही नेमाडे यांनी सांगितले.
हल्ली दिल्लीवाल्यांची भिती वाटते असे गुजलझार म्हणाले. तसेच, दिल्लीवाले काय कायदे बनवतील काही सांगता येत नाही असेही गुलझार म्हणाले.




























































