आय लव्ह चिट्टी… त्याच्यासारखे नाचायचेय! माणसासारख्या बोलणाऱ्या‘सोफिया’ रोबोची व्हीजेटीआयमध्ये धूम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हुबेहुब माणसासारखे हावभाव करत बोलणार्या ‘सोफिया’ रोबोने आज माटुंगा येथील वीर जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटयूट (व्हीजेटीआय) मधील टेक्नोव्हान्झा महोत्सवात सर्वांची मने जिंकली. अभिनेते रजनीकांत यांनी वठवलेल्या ‘चिट्टी’ या रोबोबाबत सोफियाला विचारण्यात आले. त्यावेळी तिने ‘चिट्टी मला आवडतो. मला त्याच्यासारखे नाचण्याची इच्छा आहे.’ असे उत्तर सोफियाने दिले तेव्हा व्हीजेटीआयचा परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमला. टेक्नोव्हान्झामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारीत प्रदर्शन भरवण्यात आले होते. ते प्रदर्शन पहायला आलेल्या लोकांशी सोफियाने संवाद साधला. स्पर्धेतील एक स्पर्धक रौनक राजानी याने सोफियाला प्रश्न विचारला की, ‘तुला चिट्टी रोबो माहीत आहे का? त्याचाबद्दल तुला काय वाटते? तो नेहमी म्हणतो, स्पीड वन टेरा हर्ट्झ मेमरी वन झिटाबाईट्स!’ त्यावर सोफियाने वरील उत्तर दिले.