
राजधानी नवी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थानाला आग लागल्याचे वृत्त आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पंतप्रधान निवासाच्या नेमक्या कोणत्या भागाला आग लागली, याची माहिती मिळालेली नाही. तसेच आगीचे कारणही स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग मोठी नसल्याने हानीची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Delhi: Fire has been reported at Prime Minister’s residence at 7, Lok Kalyan Marg around 7:25 pm today. Nine fire tenders have been rushed to the spot. As per sources, it is a minor fire. pic.twitter.com/wyerhwKAwv
— ANI (@ANI) December 30, 2019
नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थान सुरक्षित जागांपैकी एक मानण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी आग कशी लागली असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने सुरक्षा दलाचे जवानही घटनास्थळी उपस्थित आहेत. घटनेनंतर पंतप्रधान निवास स्थानाबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.




























































