नवीन वर्षात या स्मार्टफोनवरून व्हॉट्सऍप गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन वर्षात व्हॉट्सऍपने विंडोज मोबाईल ऑपरेटींग सिस्टिमला बाय-बाय करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबरनंतर विंडोज मोबाईल ऑपरेटींग सिस्टिमवर चालणाऱया कोणत्याही स्मार्टफोनवर व्हॉट्सऍप ऑफलाईन असेल. याशिवाय काही ऍण्ड्राईड आणि आयओएस डिव्हाईसवरूनही व्हॉट्सऍप गायब होणार आहे.

व्हॉट्सऍपने एफएक्यू सेक्शनमध्ये यासंबंधी माहिती दिली आहे. यात सांगण्यात आले आहे की डिसेंबर 2019 नंतर विंडोज मोबाईल ऑपरेटींग सिस्टमवर चालणाऱया कोणत्याही मोबाईलवर व्हॉट्सऍप सपोर्ट करणार नाही. याशिवाय फेब्रुवारी 2020 मध्ये काही ऍण्ड्राईड आणि आयओएस डिव्हाईसवर व्हॉट्सऍप काम करणार नाही. ऍण्ड्राईड वर्जन 2.3.7 या तसेच यापेक्षा जुन्या वर्जनवर चालणाऱया स्मार्टफोनवर व्हॉट्सऍप काम करणार नाही. याशिवाय आयओएस 8 आणि यापेक्षा जुन्या ऑपरेटींग सिस्टमवर चालणाऱया स्मार्टफोनवरही व्हॉट्सऍप काम करणार नाही.