
जम्मू-कश्मीरमध्ये नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जम्मू-कश्मीरमधून केंद्र सरकारने कलम 370 हटवल्यानंतर पहील्यांदाच सरकारी नोकरीसाठी देशभरातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. येथील उच्च न्यायालयात 33 जांगासाठी भरती सुरू असून जाहीरातीद्वारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
या पदांसाठी जम्मू-कश्मीर, लडाख, आणि देशातील इतर राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यातील 33 अराजपत्रित पदांपैकी 17 पद ही खुल्या वर्गांसाठी ठेवण्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्यात जम्मू-कश्मीरचे तत्कालिन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यात पुढील 2-3 महिन्यात 50 हजार जागांसाठी भरती सुरू होईल असे म्हटले होते. तसेच यासाठी मोठया प्रमाणावर इतर राज्यातील तरुणांनी अर्ज करावा असे आवाहनही त्यांनी केले होते.

























































