गोव्यात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देश विदेशातून आलेल्या लाखो पर्यटकांबरोबरच गोमंतकीयांनी काल रात्री 2019 ला निरोप देऊन 2020 चे जल्लोषात स्वागत केले. सायंकाळी ठीकठीकाणच्या किनाऱ्यांवर लोकांनी वर्षातील शेवटच्या सूर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बॉलीवुड, राजकरण,उद्योग, न्यायालय क्षेत्रात काम करणाऱ्या सेलिब्रेटींनी गोव्याला पसंती दिली होती. आयरिश पंतप्रधान लिओ वराडकर यांनी देखील गोव्यात कुटुंबा समवेत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले. सायंकाळ होताच हॉटेल्स,शॅक,रेस्टोरेन्ट मध्ये जंगी पार्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.रात्रभर संगीत जलसे सुरु होते.पर्यटक संगीताच्या तालावर मनसोक्त थिरकत आनंद लूटताना दिसत होते.

सिंगर मीका सिंग,कॉमेडीयन राजू श्रीवास्तव, सोफि चौधरी, मुबीन सौदागर आदि बॉलीवुड कलाकारांनी आपली कला सादर करून जल्लोषात रंग भरले. रात्री 12 च्या ठोक्याला फटाक्यांची आकर्षक बरसात करत सगळ्यांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ठिकठिकाणी चर्चमध्ये मध्यरात्रीच्या प्रार्थना सभा झाल्या.