
भांडण झाल्यानंतर पत्नी रागात माहेरी निघून गेली. यामुळे निराश झालेल्या पतीने आपला प्रायव्हेट पार्ट कापल्याची भयंकर घटना तामिळनाडूतील चैन्नई येथे घडली आहे. पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बाबू (40) असे त्याचे नाव असून शादी देवी (35) असे पत्नीचे नाव आहे.
बाबू आणि शादी देवी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. पण त्यांना मूल होत नसल्याने शादी देवी पतीवर सतत चिडायची. त्यातच बाबूला दारुचे व्यसन असल्याने त्यावरूनही त्यांच्यात रोज वाद व्हायचा. वाद होताच शादी देवी माहेरी निघून जायची. तिला घटस्फोट हवा होता. पण बाबूला पत्नीपासून विभक्त व्हायचे नव्हते. सोमवारीही त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शादी देवी माहेरी गेली. पण मंगळवारी ती थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी घरी आली. बाबू दारु पित असल्याचे बघून तिची सटकली व पुन्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यामुळे शादी देवी परत माहेरी निघून गेली.
शादी देवीच्या सततच्या माहेरी जाण्याला बाबू कंटाळला होता. यामुळे तो रागात किचनमध्ये गेला व त्याने चाकूने आपला प्रायव्हेट पार्ट कापला पण वेदनेने तो ओरडू लागला. बाबूचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


























































