उत्तर प्रदेश पोलीस भरती, बाथरूममध्ये गेली संगिता, बाहेर येताना झाली बबिता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये सध्या पोलीस भरती सुरू आहे. यावेळी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीत धावण्याच्या शर्यतीदरम्यान एका बोगस महिला उमेदवाराला रंगेहात पकडण्यात आले. तिच्या हातावर मोहोर नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यावेळी ती मैत्रिणीच्या जागी धावत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.

मेरठमध्ये 49 हजार पदांसाठी पोलीस भरती सुरू आहे. पोलीस भरतीत बोगस उमेदवार येऊ शकतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.  यामुळे यावेळी भरती प्रक्रियेत विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यासाठी उमेदवारांच्या हातावर शिक्के मारण्यात आले होते. जेणेकरून बोगस उमेदवार पटकन ओळखला जाईल. याचदरम्यान, बुधवारी पहील्या तुकडीत संगिता शर्मा नावाची एक महिला उमेदवारही आली होती. धावण्याच्या शर्यतीसाठी पायाला बँड आणि हातावर शिक्के मारुन सर्व महिला उमेदवार मैदानाजवळ बसल्या होत्या. त्यात संगिताही होती. पण मध्येच बाथरुमला जाते असे सांगून संगिता तिथून निसटली व तिच्या जागी डमी उमेदवार बबिता येऊन बसली. त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू झाली. पण त्यावेळी अधिकाऱ्यांनी सर्वाच्या हातावर मारण्यात आलेले शिक्के तपासले. यावेळी एका उमेदवाराच्या हातावर शिक्के नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संगिताला अटक करण्यात आली.