
लातूर जिल्ह्यात दिवसा चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. भर दुपारी शिरुरअनंतपाळ येथील शिवनगर भागातील घर चोरट्यांनी फोडले. तब्बल 1 लाख 95 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने चोरुन नेण्यात आले आहेत.
या चोरी प्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात बालाजी वैजनाथ बरवटले यांनी तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घरात पाठीमागच्या दारातून प्रवेश केला. कपाट फोडून कपाटातील 3 तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार, दीड तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, 5 ग्रॅम वजनाची सोन्याच्या तीन अंगठया, 1 ग्रॅम वजनाच्या 5 सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे 1 लाख 95 हजाराचा ऐवज चोरून नेला. भर दुपारी 1 ते 4 वाजण्याच्या कालावधीत ही चोरी करण्यात आली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी हे करीत आहेत.





























































