
प्रशासन गतिमान होण्यासाठी सक्षम अधिकारी असणे गरजेचे असते. पण बीडमध्ये अधिकाऱ्याचा वाणवा निर्माण झाला आहे, जबाबदारीचे पदे रिक्त असल्याने कामकाज ठप्प झाले आहे. अधिकारी बीड जिल्ह्यात येण्यास तयार नसल्यामुळे एका अधिकाऱ्यांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या येऊन पडल्या आहेत.
बीड जिल्ह्यात सध्या अनेक जबाबदारीचे पदे रिक्त आहेत. महसूल विभागातील पदावर अधिकारी नसल्याने बीड जिल्ह्याचा कारभार पदभारावर सुरू आहे. नवीन अधिकारी बीड जिल्ह्यात येण्यास उत्सुक नाहीत. अन ज्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बीडमध्ये बदली झाली त्या अधिकाऱ्याने बीडमध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण प्रशासन मात्र ठप्प झाले आहे, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांची संभाजीनगरला बदली होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला त्यांच्या जागेवर अद्याप नवीन जिल्हाधिकारी येऊ शकले नाहीत. तर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सध्या जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे आहे. जिल्हाधिकारी या पदासह अप्पर जिल्हाधिकारी बीड, अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई, निवासी उप जिल्हाधिकारी बीड ,जिल्हा पुरवठा अधिकारी बीड, उप जिल्हाधिकारी जायकवाडी प्रकल्प बीड,जिल्हा गौण खनिज अधिकारी बीड , तहसीलदार बीड सह तब्बल 15 नायब तहसीलदार यांच्या जागा रिक्त असल्याने सरकारी कामांचा खोळंबा झाला आहे.
























































