
इराकमधील अमेरिकी दूतावासावर रॉकेटने हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकी दूतावासात हा रॉकेट हल्ला झाला आहे. तसेच अमेरिकन सुरक्षा बलाचे ठिकाण असलेल्या मध्ये इराकमधील एअरफोर्स बेसवर दोन रॉकेट हल्ले झाल्याचे समजते आहे.
आज तक या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बगदादच्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकन दूतावासाच्या आत कात्युषा रॉकेटचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त अद्याप समजू शकलेलं नाही.
दरम्यान, याआधी शुक्रवारी सकाळी अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ला करून इराणचा मेजर जनरल कासिम सुलेमानी आणि इराकी मिलिशियाचे कमांडर अबू महदी अल-मुहंडिस यांना ठार केलं होत. यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावद जाफरी यांनी ‘अमेरिकेला त्यांच्या या कृतीची किंमत चुकवावी लागेल’, असा इशारा दिला होता.


























































