दो हजार बीस, हटाओ नितीश; लालू प्रसाद यादव यांचा नारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lalu prasad yadav

2015 साली बिहार विधानसभा निवडणूक एकत्र लढवणारा नितीश कुमार यांचा जदयू व लालू प्रसाद यादव यांच्या राजदने एकत्र निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीत राजदला सर्वाधिक 80 जागा तर जदयूला 71 जागा मिळाल्या होत्या. या युतीचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांची निवड झाली तर लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाला होता. मात्र वर्षभराने नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडत भाजपच्या साथीने सत्तास्थापन केली. नितीश कुमार यांच्यामुळे राज्यातील राजदची अवस्था वाईट झाली होती.

2015 साली एकमेकासोबत लढणारे राजद व जदयू हे 2020 मध्ये होणाऱ्या विधानसबा निवडणुकीसाठी एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. भाजप जदयू या युतीला हरविण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी कंबर कसली असून लालूंनी रुग्णालयातून या युतीविरोधात प्रचार सुरू केला आहे. लालूंनी शनिवारी ‘दो हजार बीस, हटाओ नितीश’ असे ट्विट केले होते. तसेच त्यांनी ट्विटरवर #2020_हटाओ_नीतीश अशा हॅशटॅगही सुरू केला आहे. रविवारी सकाळी सुद्धा लालूंनी नितीश कुमारांवर निशाना साधत त्यांच्या कारभाराला ‘घटिया’ म्हटले आहे.