
दिल्लीत गेल्या पाच वर्षात 1 हजार 294 अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला दिली. दिल्लीत मुलींच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर याचिका दाखल करण्यात आली असून या आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने ठोस धोरण राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. नैराश्य तसेच आरोग्यांसंबंधीच्या योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिल्ली पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.
























































