
महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अनेक वेळा गैरसोय होते. तसेच पालकांच्याही काही सूचना असतात. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या या सूचना व तक्रारी समजून घेण्यासाठी पालिका शाळांमध्ये तक्रार पेटी बसवा, असा आदेश हायकोर्टाने पालिका प्रशासनाला दिले.
शाळांमध्ये असलेल्या गैरसोयी, अपुऱया सुविधा याबाबत चिंता व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते भगवान रयानी यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली.
प्रत्येक शाळांमध्ये पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आदी मूलभूत सोयीसुविधा आदींबाबत विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असल्यास ते या तक्रार पेटीद्वारे सदर बाब शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ शकतात. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या सूचनांची दखल घ्यावी व त्याचे निराकरण करावे असे मतही खंडपीठाने व्यक्त केले. महापालिकेच्या वतीने ऍड. याप्रकरणाची पुढील सुनावणी 20 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
























































