जम्मू कश्मीरमधील पुलवामा येथे चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. पुलवामातील चूरसू या गावात ही चकमक झाली.

हिंदुस्थानी सैन्याला चूरसू भागात दहशतवादी लपून बसल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर या परिसराला घेरण्यात आलं आणि शोधमोहीम राबवण्यात आली. सुरक्षा दलांची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. या दहशतवाद्याची ओळख पटली असून जाहिद हसन असं त्याचं नाव आहे. तो मूळचा अनंतनाग इथला आहे.

या परिसरात अजूनही शोधमोहीम राबवली जात असून आणखी काही दहशतवादी सापडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.