लातूरात दोन दुचाकी चोरट पकडले, 26 मोटारसायकल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी हैदोस घातला आहे. दररोज चार-पाच दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत.  या गुन्ह्यासंदर्भात नेमलेल्या पथकाने दोन दुचाकी चोरट्यांना पकडले. त्यांच्याकडून चोरी केलेल्या तब्बल 26 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नेमलेल्या विशेष पथकास सरफराज उस्मान शेख रा. इस्मालपुरा लातूर हा चोरी केलेली मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला मोटारसायकलसह त्यास ताब्यात घेण्यात आले असता ती मोटारसायकल चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या सोबत गजेंद्र शिवराज सरवदे रा. भिम नगर कासारसिरशी ता. निलंगा हा साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करुन तपास केला असता त्यांनी लातूर शहरातील मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

या मोटारसायकल  त्यांनी लातूर, निलंगा, कासारशिरसी, औराद शहाजनी, नांदेड जिल्ह्यातील कंधार, परभणी जिल्ह्यातीला पालम या भागात विक्री केल्याचे सांगीतले. तब्बल 26 मोटारसायकल जप्त करण्यात पोलीस पथकास यश आले आहे.