घरगुती वापराच्या गॅस टाक्यांमधील इंधन वाहनांमध्ये भरणाऱ्यांवर कारवाई; 18 गॅस टाक्या जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती वापराच्या गॅस टॅक्यांमधील इंधन वाहनांमध्ये भरणारे इसमांवर छापा टाकुन पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई पोलिस आणि पुरवठा अधिकार्‍यांनी केली आहे. आरोपीमध्ये सय्यद जिशान आरीफ आणि जावेद आमीश सय्यद यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 2.30 वाजता प्लॉट नं.26,सर्व्हे नं.346/9,वाबळे कॉलनी, लक्ष्मी आटा ट्रेडींग कंपनीचे आवारात, मुकुंदनगर ता.जि.नगर येथे अचानक छापा टाकुन बेकायदेशोर रित्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा साठा करुन बाजारात चढया भावाने विक्री करणारे व गॅस टाक्यांमधील इंधन वाहनांमध्ये भरणारे इसमांना पोलिस व पुरवठा विभागाच्या पथकारे ताब्यात घेतले. आरोपींकडे 1,71,850/- रुपये किंमतीच्या 18 गॅस टाक्या व मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी सय्यद आणि जावेद यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुर.नं. 10/2020 जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3 व 7 करण्यात आलेला आहे.