शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीला अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री अंदाजे सवा नऊ वाजता अपघात झाल्याने आ.रायमुलकर सह तिन जण जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर संभाजीनगरला रवाना करण्यात आले आहे. संजय रायमुलकर हे जानेफळ येथून मेहकरकडे त्यांच्या गाडीने (क्रमांक MH 28 AZ 7771) येत असता नायगाव भालेगाव रस्त्यावर समोरून रेतीने भरलेल्या 407 ने (क्रमांक MH 28 H 9701)  जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहने पलटी झाली. या अपघातात आमदार संजय रायमुलकर, चालक पंजाब गुडधे,सुरक्षा रक्षक ज्ञानेश्वर निकस या तिघांना मुका मार लागला आहे. रायमुलकर यांच्या छातीला मार लागला असून इतरांना सुद्धा छातीला मार लागला, असे डॉ. निलेश गट्टानी यांनी सांगितले. प्राथमिक उपचारानंतर तिघांना संभाजी नगरला रवाना करण्यात आले आहे. मेहकर येथील मल्टि हॉस्पिटलमध्ये शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, व सर्व सामान्य नागरीकांनी यावेळी गर्दी केली होती.