लोकसंख्या नियंत्रण कायदा – केंद्र सरकारला न्यायालयाची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court-of-india

लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला नोटीस बजावली. भाजप नेते तथा ज्येष्ठ विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. उपाध्याय यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयात पॉवर प्रेझेंटेशनही केले आहे. यात त्यांनी न्या. वेंकटचलय्या आयोगाचाही उल्लेख केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज या याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारला नोटीस बजावली. लोकसंख्या नियंत्रणासाठी तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 2000 मध्ये न्या. वेंकटचलय्या आयोगाची स्थापना केली होती. या आयोगात न्या. सरकारिया, न्या. जीवन रेड्डी, न्या. पुन्नेय्या यांच्यासह माजी ऍटर्नी जनरल केशव परासरन, सोली सोराबजी, सुभाष कश्यप, लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा, तत्कालीन खासदार सुमित्रा, ज्येष्ठ पत्रकार सी. आर. इराणी, ज्येष्ठ मुत्सद्दी आबिद हुसैन यांचा समावेश होता. 31 मार्च 2002 रोजी या आयोगाने आपला अहवाल केंद्र सरकारला सोपवला होता.