
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार प्लॅन आणला आहे. या प्लॅननुसार ग्राहकांना दीड हजार जीबी डेटा मिळणार आहे. हा ब्रॉडबँड प्लॅन असून त्याची किंमत 1 हजार 999 रुपये इतकी आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने ग्राहकांसाठी एक मोठा प्लॅन आणला आहे. त्यात ग्राहकांना तब्बल दीड टी.बी डेटा मिळणार आहे. त्याची वैधता 90 दिवसांसाठी असून तो सध्या फक्त तेलंगाणा आणि चेन्नईमध्ये उपलब्ध आहे.
या प्लॅनच्या फीचरनुसार ग्राहकांना 200 MBPS ने दीड TB डेटा मिळेल. तसेच देशभरातील कुठल्याही भागात मोफत फोन कॉल सुविधा मिळणार आहेत. हा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 2 MBPS अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.
या प्लॅनची वैधता एक महिन्याची असणार आहे. हा प्लॅन विकत घेताना ग्राहकांना डिपॉजिट म्हणून एक रक्कमही भरावी लागणार आहे. 6 एप्रिल पर्यंत हा प्लॅन ग्राहक घेऊ शकतात. नंतर हा प्लॅन ग्राहकांना मिळणार नाही, कारण हा प्रमोशनल प्लॅन आहे.





























































