
पुरामुळे यंदा राज्यातील साखरेच्या उत्पादनात मोठी घट होणार असली तरी पुढील वर्षाच्या गाळप हगांमात राज्यात साखरेच्या उत्पादनात दुपटीने वाढ होईल अशी माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने आयोजित साखर परिषदेत मिळाली. पुराचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून पुरेसा ऊसच नसल्याने अर्ध्याहून अधिक कारखाने चालू होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे साखरेचे उत्पादन घटून 55 लाख मेट्रिक टनापर्यंत खाली येईल असे त्यांनी सांगितले. मात्र सध्या उसाच्या लागवडीत मोठी वाढ झाली असल्याने पुढील वर्षी साखरेचे उत्पादन 55 लाख मेट्रिक टनावरून 100 लाख मेट्रिक टनापर्यंत जाईल असा विश्वास सर्वांची व्यक्त केला. यावेळी ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल विठलानी, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे एमडी प्रकाश नाईक नवरे आदी उपस्थित होते.

























































