राजदकडून तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय जनता दलाकडून आगामी बिहार विधानसभा निवडणूकीसाठी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार घोषित केले आहे. राजदच्या या निर्णयाने त्याचे युतीतील साथिदार हमचे जितनराम मांझी व वीआयपीचे मुकेश सहनी हे खूष नसल्याचे समजते. मात्र राजदने युती टिकविण्यासाठी मुख्यमंत्रीपदावर तडजोड करणार नसल्याचे सांगितले आहे.

राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी तेजस्वी यादवच महागठबंधनचे मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट केले आहे. ‘राजद हा राज्यातील मोठा पक्ष आहे. गेल्या निवडणूकीत राजदला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. जसं राष्ट्रीय स्तरावर आपण काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष मानून राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार मानत होतो. तसेच तेजस्वी यादव हे आपले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत’, असे तिवारी यांनी सांगितले आहे. या निवडणूकीत राजद 243 पैकी 150 जागांवर निवडणूक लढवणार असून इतर पक्षांना 93 जागा ठेवण्यात येणार आहे.