शिवभोजन योजने करता नगर शहरातील सहा जागा पात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिव भोजन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून नगर शहरातील 6 जागा या योजनेसाठी पात्र झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अधिपत्याखालील असलेल्या समितीने या संस्था पात्र ठरलेल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये शिवभजन योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू करायची असून जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. दहा रुपयांमध्ये भोजनाची व्यवस्था बारा ते दोन या वेळेमध्ये करण्यात येणार आहे. नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी जागेची पाहणी सुद्धा केली होती शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार जागा आवश्यक होते या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर येथील जिल्हा प्रशासनाकडे दहा प्रस्ताव प्राप्त झालेले होते त्यातील सहा प्रस्ताव हे पात्र ठरले आहेत. पात्र असलेल्यांमध्ये संजय डोळसे संस्थेचे नाव हमाल पंचायत संचलित कष्टाची भाकर केंद्र बसण्याची आसन क्षमता 25 ठिकाण माळीवाडा बस स्थानक नगर, धनंजय डोके स्वामी समर्थ एसटी कॅन्टीन नगर ठिकाण स्वस्तिक चौक बस स्थानक, जगन्नाथ कराळे भैरवनाथ भेळ स्टॉल तारकपूर बस स्थानक नगर, शितल त्रिपाठी राघव गूड फूड प्रॉडक्ट जिल्हा रुग्णालय नगर ,दत्तात्रय गायकवाड दत्त हॉटेल रेल्वे स्टेशन समोर नगर, महेश धुमाळ हॉटेल सुवर्ण प्राईड संचलित अन्नछत्र नगरः तारकपूर बसस्थानकासमोर अशांच्या संस्था पात्र झालेले आहेत.