
मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक असेल. त्यामुळे धिम्या लोकल जलद मार्गावरून धावतील. मुलुंड-माटुंगादरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. सकाळी 10.58पासून ते दुपारी 4 पर्यंत धिम्या लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावरून धावतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांत थांबतील. त्यानंतर या लोकल धिम्या मार्गावरून धावतील.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावरील पनवेल/बेलापूरहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 11.06पासून ते दुपारी 4.01पर्यंत रद्द केल्या जातील. सीएसएमटीहून बेलापूर/ पनवेल दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 10.03पासून ते दुपारी 3.16पर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी 10.12पासून ते दुपारी 3.53 दरम्यान पनवेलहून ठाणे दिशेकडे जाणारी लोकल सेवा रद्द करण्यात येईल.
ठाण्याहून पनवेलला जाणारी लोकल सेवा सकाळी 11.14पासून ते दुपारी 3.20 यादरम्यान रद्द करण्यात येईल. नेरूळ/बेलापूरहून खारकोपरसाठी सुटणाऱ्या लोकल सकाळी 11.02 ते दुपारी 3.22पर्यंत रद्द करण्यात येतील. खारकोपरहून नेरूळ/बेलापूरसाठी सुटणाऱ्या लोकल सकाळी 11.30 ते दुपारी 4.16 पर्यंत रद्द करण्यात येतील. यादरम्यान पनवेल ते अंधेरी लोकल सेवा रद्द असेल.


























































