
देशभरात सध्या संत साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून वाद सुरू आहे. परंतु पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ आहे आणि सेलूचे संत श्री केशवराज बाबासाहेब महाराज हे साईबाबांचे गुरू आहेत हेच सत्य असतानाही आणि त्याबाबत अनेक पुरावे उपलब्ध असतानादेखील वाद सुरू आहे. याबाबत 24 जानेवारीला शिवसेनेचे तालुकाप्रमुख काशीनाथ घुमरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना याबाबत उपलब्ध असलेले 100 पानांचे विविध पुरावेच सादर केले व जन्मस्थळ पाथरीच असल्याचे सांगत पाथरी हे जन्मस्थळ व सेलू हे गुरूस्थळ जाहीर करण्याची विनंती केली. साईबाबा हे पाथरी येथेच जन्मलेले आहेत हे निर्विवाद सत्य आहे आणि त्यांनी सेलू येथील केशवराज बाबासाहेब महाराज यांना आपले गुरू मानून सेलू येथे वास्तव्य केलेले आहे, असेही घुमरे म्हणाले.






























































