
पाथरी-माजलगाव रस्त्यावर 29 जानेवारी रोजी रात्री उशीरा दुचाकीस्वारांना अज्ञात वाहनाने उडविल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण माजलगावकडून दुचाकीवर पाथरी तालक्यातील आपल्या गावाकडे परत येत होते.
गुरुवारी सकाळी या दुर्घटनेची पाथरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मृतांमध्ये पाथरी तालुक्यातील किनोळा येथील दीपक कणसे आणि वरखेड येथील युवराज मगर या दोन तरुणांचा समावेश आहे.
पाथरी तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या किनोळा येथील दीपक अच्युतराव कनसे आणि युवराज सुभाषराव मगर हे दोघेजण दवाखान्याच्या कामानिमित्त बुधवार, 29 जानेवारी रोजी सकाळी माजलगावकडे गेले होते. रात्री माजलगावहून परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात दोघेही जागीच ठार झाले. अपघातील मृत दीपक अच्युतराव कणसे हे वरखेड ग्रामपंचायतचे सदस्य होते.





























































