
अभिनेत्री तापसी पन्नु सध्या तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तिचे चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होणार आहेत. क्रिकेटपटू मिताली राज हिचा बायोपिक असेलला ‘वेल डन मितु’ हा चित्रपटही त्यात आहे. त्याखेरीज ती सध्या थप्पड या नावाने चांगलीच चर्चेत आली आहे. हे नाव तिच्या आगामी चित्रपटाचं आहे.
‘थप्पड’, क्या ये बस इतनीसी बात है..? क्या प्यार में ये चीज भी जायज है? अशी विचारणा असलेलं एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता थप्पड या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एक विवाहित स्त्री, तिची चौक, रागाच्या भरात नवऱ्याने तिला मारलेली एक ‘थप्पड’ आणि त्यानंतर जागृत होणारा स्त्रीचा आत्मसन्मान या सगळ्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते.
तापसी पन्नुने या महिलेची भूमिका केली आहे. नाम शबाना, पिंक सारख्या दमदार चित्रपटांनंतर तापसीचा आणखी एक महिलाप्रधान चित्रपट येऊ घातला आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ येत्या 28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.
पाहा ट्रेलर-
































































