कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 259 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प

कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले असून आतापर्यंत 259 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 12 नागरिकांना या आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चीनमधील या आजाराच्या थैमानानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WORLD HEALTH ORGANISATION) आरोग्य आणिबाणी जाहीर केली आहे.

चीनमधील कोरोनाच्या फैलावाचा अनेक देशांनी धसका घेतला आहे. त्यांनी आपल्या नागरिकांना चीनमध्ये जाणे टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच काही देशांनी चीनच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच नागरिकांना मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर शुक्रवारी ‘जागतिक आणीबाणी’ घोषित केली.

चीनमध्ये आतापर्यंत 31 प्रांतामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णांमुळे चीन सरकारने 10 दिवसांत 1000 खाटांचे रुग्णालय बांधण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस सर्वात जास्त चीनमधील वुहान शहरात पसरला आहे. त्यामुळे हॉस्पिटल या शहराच्या बाहेर बांधण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पहिली घटना 31 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. हा आजार 2003 मध्ये पसरलेल्या सीव्हिअर अॅक्यूट रेसिपिरेट्री सिंड्रोम म्हणजे सार्स सारखाच धोकादायक असल्याचे मानले जाते.