
जम्मू कश्मीरमध्ये पोलिसांना दहशतवाद्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळालं आहे. पुलवामा येथे पोलिसांनी टाकलेला धाडीत एका दहशतवाद्याला अटक झाली आहे. शोएब मंजूर असं या दहशतवाद्याचं नाव आहे. शोएब हा जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी पुलवामा जिल्ह्याजवळील करीमाबाद येथे जैश कमांडर जाहिद शेख याच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा त्याच्या घरात शोएब होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.




























































