
चीनच्या हुनान प्रांतातून कोरोना व्हारयसचे संक्रमण सुरू झाले असून हा व्हायरस आता जगभरात फैलावत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये 425 जणांचा मृत्यू झाला असून 20 हजार लोकांना याचे संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, कोरोना व्हायरस सीफूडमुळे पसरला नसून चीनमधील जैविक प्रयोगशाळेतून पसरल्याचा दावा दावा काही अहवालातून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे चीनमधील जैविक प्रयोगशाळा वादात सापडली आहे. मात्र, याबाबतचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. चीनच्या प्रशासनाने याबाबत मौन पाळले असून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
कोरोना व्हायरस हुनानच्या सीफूड मार्केटमधून पसरल्याचे सांगण्यात येते. त्याच्या जवळच ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरालॉजी नॅशनल बायोसफ्टी लॅब’ ही प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत इबोला, निपाह आणि इतर घातक व्हायरसवर संशोधन करण्यात येते. ही प्रयोगशाळा 4 लेव्हल सर्टिफाइड आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेतूनच घातक कोरोना व्हासरस परसल्याचे काही अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, चीनच्या प्रशासनाने यावर मौन बाळगले आहे. ऑनलाइन पोर्टल ग्रेटगेमइंडियाच्या केलेल्या तपासात कॅनडा आणि चीनमधील बायोजलॉजिकल वारफेअर प्रोगॅममधील दोन एंजेटचा याच्याशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. सौदीतील एका व्यक्तीला अज्ञात व्हायरसमुळे त्रास होत होता. त्या व्हायरसचे नमुने कॅनडातून चीनच्या या प्रयोगशाळेत आल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या प्रयोगशाळेतील एंजटने या व्हारसचे नमुने चोरल्याचाही आरोप होत आहे.
मार्च 2019 मध्ये कॅनडातील एनएमएल लॅबमधून घातक व्हायरस असलेले एक जहाज चीनमध्ये दिसले होते. त्यानंतर कॅनडा चीनला असे घातक व्हायरस का पाठवत आहे, असा सवाल जागतिक पातळीवर उपस्थित करण्यात आला होता. हे व्हायरस शक्तीशाली जैविक शस्त्रे बनू शकतात, अशी भीती एनएमएल लॅबने व्यक्त केली होती. या घटनेचा संबंध या लॅबमध्ये काम करणाऱ्या चीनच्या एंजटशी आहे. या घटनेनंतर चार महिन्यात लॅबने चीनच्या वायरलॉजिस्टच्या एका गटाला निलंबित केले होते. ही लॅबही लेव्हल 4 सर्टिफाइड आहे. अमेरिकेतील निवडक प्रयोगशाळांपैकी ही एक असून त्यात घातक व्हायरसवर औषधे शोधण्याचे काम करण्यात येते. चीनमध्ये जैविक प्रयोगशाळांवर वाढती गुंतवणूक आणि त्यात होणारे प्रयोग नैतिक मूल्यांचे उल्लंघन करणारे असल्याचे अमेरिकेतील स्पेशल ऑपरेशन कमांड बायोवारफेअरचे ज्येष्ठ संशोधक जेम्स गियारडानो यांनी सांगितले. त्यामुळे चीन त्यांच्या प्रयोगशाळेत घातक जैविक शस्त्रे बनवत असल्याचा संशय बळावत असल्याचेही ते म्हणाले. जगातील असाध्य व्हायरसवरील औषधे आणि लसी फक्त आपल्याकडेच असाव्यात, यासाठीही चीनचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
चीनमधील संशोधकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण नैसर्गिक असून यात प्रयोगशाळेचा कोणताही हात नाही. मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप वाढत असल्याने निसर्गाने मानवाला दिलेली ही शिक्षा असल्याचे संशोधक शी जंग ली यांनी सांगितले. तसेच जगभरात कोणत्याही नवीन व्हायरसचे संक्रमण झाल्यावर चीनवरच संशय का व्यक्त करण्यात येतो, असा सवाल शी जंग यांचे सहकारी पीटर दासजेक यांनी उपस्थित केला आहे. कोरोना व्हायरस हा वटवाघूळांमधील व्हायरसशी 96 टक्के मिळताजुळता आहे. त्यामुळे हा व्हायरस 18 वर्षांपूर्वी पसरलेल्या सार्सप्रमाणेच वटवाघूळांपासून पसरल्याचे शी जंग यांनी सांगितले. तसेच वघवाघूळांमधून सी फूडद्वारे माणसांमध्ये याचे संक्रमण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या व्हायरसच्या उत्पत्तीबाबत करण्यात आलेल्या संशोधनातून हा व्हायरस नैसर्गिक संकट असल्याचे दिसून आले आहे. त्याचा प्रयोगशाळेतील संशोधनाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



























































