अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन केला विनयभंग; आरोपीला सहा महिने कारावास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग केल्या प्रकरणी नगर येथील आरोपीस सहा महिने तुरंगवास व दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी ठोठावली आहे. सोमनाथ भोर असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी अल्पवयीन पिढीत मुलगी ही भोरवाडीमध्ये दहाविमध्ये शिक्षण घेत होती. घटनेपूर्वी तिन महिन्यापासून आरोपी हा पिढीत मुलीला शाळेत जात येतातिची छेड काढत होता. पिढीत मुलींने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर मुलीच्या आई वडीलांनी आरोपीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने ऐकले नाही. याप्रकरणी 4 फेब्रुवारी 2016 रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये वरील आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधीत आरोपीला अटक करण्यात आली होती. येथील न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल केल्यानंतर सरकारी पक्षाच्यावतीने चार साक्षीदार तपासले होते. दोन्ही बाजुचा युक्तीवाद एकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 6 महिने कैद व 10 हजार रुपयं दंडाची शिक्षा ठोठावली आहे.