
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांनी CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारित कायद्याला पाठिंबा दिला आहे. तसेच NPR चेही समर्थन केले आहे.
देशभरात नागरिकत्व कायद्याला विरोध असताना रजनीकांत यांनी नागरिकत्व सुधारित कायद्याला पाठिंबा दिला आहे. बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना रजनीकांत म्हणाले की, या कायद्यामुळे कुठल्याही मुस्लिम व्यक्तीला त्रास होणार नाही. आणि जेव्हा कुठल्याही मुस्लिम व्यक्तीला त्रास होईल तेव्हा आवाज उठवणारा पहिल्या व्यक्ती मी असेल असेही रजनीकांत म्हणाले. NPR चे समर्थ करतान रजनीकांत म्हणाले की, देशासाठी लोकसंख्या नोंदणी गरजेची आहे. ही नोंदणी देशाच्या प्रगतीसाठी योग्य पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.



























































