राममंदिरासाठी लढा उभारणाऱ्यांना भारतरत्न द्या – तोगडिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मी भक्त आहे. त्यामुळे त्यांना तर भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे. पण, कोणीही पुढे येण्यास तयार नसतानाच्या काळात राममंदिरासाठी ज्यांनी लढा उभारला असे हिंदुहहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विहिंपचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस तसेच महंत अवैद्यनाथ यांना ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे केली.

अगदी सुरुवातीच्या काळात राममंदिरासाठी कोणीही पुढे येण्यास तयार नव्हते. अशा काळात या चौघांनी हिंदू जनजागरण करीत अयोध्येत राममंदिर व्हावे यासाठी वातावरणनिर्मिती केली. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात यावा, असे तोगडिया म्हणाले.