
अयोध्येमध्ये भव्य राम मदिर बनावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकारने एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टमध्ये राम मंदिरासाठी झगडणाऱ्या संत महंत मंडळींना स्थान न दिल्याने ती नाराज झाली आहे. या प्रकरणी दिगंबर आखाड्याचे महंत सुरेश दास यांनी गुरुवारी संतांची बैठक बोलावली आहे, या बैठकीमध्ये पुढील निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे.
महंत सुरेश दास यांनी मोदी सरकारवर संतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी बैठक बोलावली असून यामध्ये सगळे संत सामील होतील असा दावा त्यांनी केला आहे. या बैठकीत पुढे काय करायचे आहे हे ठरेल, गरज पडली तर आंदोलनही करू असा इशारा महंत दास यांनी दिला आहे. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास हे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्न,पाण्याचा त्याग केला आहे. महंत परमहंस यांनी मागणी केली आहे की सरसंघचालक मोहन भागवत यांना राम मंदिर निर्माणासाठीच्या ट्रस्टचे प्रमुख अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात यावे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिर निर्माणासाठी प्रखरतेने बाजू मांडणाके ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ के परासरन बे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य असणार आहेत. याशिवाय या ट्रस्टमध्ये पुण्याचे गोविंद देव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा , निर्मोही आखाड्याचे धीरेंद्र दास हे देखील सामील असणार आहेत.






























































