वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 15 लाखांची नुकसानभरपाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीलगाय (रोही) व माकड (वानर) या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयांची तसेच जखमी झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तींना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

या निर्णयानुसार नीलगाय (रोही) व माकडाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसास 15 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. या रकमेपैकी तीन लाख रुपये तत्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित बारा लाख रुपये वारसाच्या राष्ट्रीयीकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱया संयुक्त खात्यात ठेव रक्कम जमा करण्यात येणार आहे.