
मैत्रिणाला पाठवण्यासाठी लिहिलेला मेसेज बॉयफ्रेंडला पाठवल्यामुळे फजिती झालेल्या महिलेच्या चॅटचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. माझ्या खासगी जीवनात आपल्या सर्वांचे स्वागत आहे, असं म्हणत महिलेन स्वत:च दोघांमधील चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला. या स्क्रीनशॉटवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
ती महिला डॅन नावाच्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारत होती. चॅटिंग सुरू असतानाच त्यादिवशीचा Rocka बँडचा परफॉरमन्स पाहण्याची इच्छा असल्याचे महिलेने डॅनला सांगितले. त्यावर डॅनने किती वाजता कार्यक्रम पाहण्यासाठी जाणार असल्याचे विचारले. रात्री 10 च्या सुमारास आपण तिथे जाणार असल्याचे महिलेने सांगितले. त्यावर डॅन OK म्हणाला.
दोघांचं बोलणं सुरू असतानाच डॅन सोबत त्या कार्यक्रमाला जाऊ नये असं महिलेला वाटत होतं. तिला ही बाब आपली मैत्रीण केटला कळवावीशी वाटली.
तिने मैत्रिणीला सांगितलं की, ‘केट मला डॅनसोबत कार्यक्रमाला जायचं नाहीय. मला अगदी एकटं वाटतं आहे आणि त्याच्यासोबत जाण्यास मला भितीही वाटते आहे. हा.. हा.. हा.. खरचं मी त्याच्यासोबत तिथं जाऊ का?’

मात्र हा मेसेज पोस्ट केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपण चुकून डॅनलाच हा मेसेज पाठवला आहे. तो मेसेज डॅनने वाचला आणि त्यावर उत्तर देण्यासाठी टाईप करू लागला. या महिलेने त्यावेळी स्क्रीन शॉट घेतला आणि सोशल मीडियावर आपली फजिती जगजाहीर केली. आता ‘डॅन’ने तिला नक्की काय रिप्लाय दिला असेल याचे तर्कवितर्क सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहेत.




























































