
दादर-माटुंगा रेल्वे स्थानकावरील रेल्वे पुलावर ये-जा करणाऱया तरुणींचा विनयभंग करणाऱया विकृताच्या अखेर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पीडित तरुणींनी त्याच्या विरोधात तक्रार न दिल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई झाली नव्हती. अखेर पोलिसांनी त्याला बेडय़ा ठोकल्या.
रेल्वे पुलावर एक तरुण तरुणींचा विनयभंग करीत असल्याचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारित झाला होता, मात्र त्याच्या विरोधात त्या तरुणींनी कोणतीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे रबिऊर खान याला चोरीच्या गुह्यात अटक करून सोडून देण्यात आले होते. पण या घटनेविरोधात सर्वत्र आवाज उठल्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्याद देत रबिऊरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.


























































