अमरावतीत भयंकर अपघात, गाडीचा चेंदामेंदा होऊन तीन ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरूड वरून अमरावतीकडे येणार्‍या स्विफ्ट डिझायर गाडीला झालेल्या भयंकर अपघातात सेवानिवृत्त शिक्षक पतीपत्नीसह मुलगा ठार झाल्याची घटना आज 8 फेब्रुवारी रोजी माहुली गावाजवळ हा अपघात घडला. हा अपघात इतका जबरदस्त होता की त्यात गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. मात्र सुदैवाने या अपघातात या दाम्पत्याचा नातू बचावला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार वरूड येथील गजानन महाराज मंदिराजवळ राहत असलेले प्रभाकर रामचंद्र काळबेंडे (74) पत्नी राजमती (62) व मुलगा सोमेश (25) व मुलीचा मुलगा वरद सुरेंद्र दाभोळकर (9) हे स्विफ्ट डिझायर गाडीने वरूडवरून येत होते. दरम्यान त्यांची गाडी माहुली जवळ असलेल्या एका पुलाजवळ आली असताना या गाडीची धडक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक्टरच्या ट्रॉलीवर झाली. यात प्रभाकर, राजमती, सोमेश जागीच ठार झाले. तर गाडीत असलेला नातु वरद आतच अडकला होता. अपघाताची बातमी कळताच नागरिकांनी धाव घेऊन गाडीत फसलेल्या वरदला बाहेर काढले व लगेच रूग्णालयात पाठविले. वरदला जास्त मार लागला नाही मात्र सोबत असलेले आजी आजोबा व मामा यांचा जागीच मृत्यू झाला. प्रभाकर व राजमती सेवानिवृत्त शिक्षक असून नियमित वैद्यकीय तपासणीकरिता अमरावतीला येत होते.ृ