
प्रसिद्ध अभिनेत्री कल्की कोएचलीनने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कल्कीने शुक्रवारी रात्री बाळाला जन्म दिला आहे. कल्की व तिचे बाळ दोघेही सुदृढ असल्याचे समजते.
कल्की व तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग यांचे हे बाळ असून या दोघांनी अद्याप लग्न केलेले नाही. कल्की लग्नाआधीच आई झाल्याने सुरुवातीला तिच्यावर टीका देखील झाली होती. मात्र कल्कीने ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत तिचा प्रेग्नेन्सीचा काळ एन्जॉय केला होता. कल्की तिच्या बेबी बम्पचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करायची.
कल्कीने काही दिवसांपूर्वी तिला अंडर वॉटर डिलिव्हरी करायची आहे असे सांगितले होते. त्यासाठी ती गोव्याला जाणार होती. मात्र आता कल्कीची डिलिव्हरी गोव्यात झाली की मुंबईत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


























































