कासारगावातील जुगार अड्ड्यावर छापा, 5 लाख 22 हजाराचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर येथील मौजे कासारगाव येथे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यानंतर तब्बल 18 जणांवर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 लाख 22 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी महेश नागनाथ पारडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. कासारगाव येथे जुगाराचा अड्डा चालवण्यात येत होता. तिर्रट जुगार खेळत असताना प्रतीक संजय सूर्यवंशी, चेतन विनोद माने, शरिफ शमशोद्दीन शेख, बाबा सुधाकर गायकवाड, बाबू दुर्गा चव्हाण, विलास चंदर सेनूरे, मोहसीन नूर शेख, अतिक हानिफसाब बागवान, शेखर सिताराम धनगर, महेंद्र सुभाष कांबळे, गोरोबा दगडू कांबळे, शेख हसन रशिदसाब, आकाशसिंग भोपालसिंग जुन्नी, महादेव बालाजी कांबळे, सागर सोनकांबळे, युनूस घोडेवाले, किशोर हुलगुंडे, अफजल (सर्वजण रा.लातूर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख 25,510 रुपये आणि 4 लाख 97 हजार रुपयांची वाहने जप्त करण्यात आली.