छाप्यात पकडले 90 हजार बनावट कंडोम, अधिकारी हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुटुंब नियोजनाच्या साधनांमध्ये कंडोम एक प्रभावी साधन आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी तसंच सुरक्षित शारीरिक संबंधासाठी कंडोम उपयुक्त आहे. परंतु त्याचा दर्जा योग्य नसेल तर गर्भधारणेचा धोका असतोच शिवाय लैंगिक संक्रमणातून होणारे रोगही भेडसावतात. त्यामुळे बऱ्याचदा सरकारतर्फे बनावट कंडोमच्या अवैध व्यापार उद्ध्वस्त केला जातो.

इंग्लंडमध्येही गेल्या दोन वर्षांत बनावट कंडोमची असंख्या पाकिटं जप्त करण्यात आली आहेत. इंग्लंडच्या द मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने 2018 ते 2019 दरम्यान संपूर्ण देशात तब्बल 1 लाख अधिक बनावट कंडोम जप्त केले आहेत. यातले 90 हजार कंडोम फक्त एकाच छाप्यात जप्त करण्यात आले आहेत. बनावट कंडोमचा इतका मोठा साठा पाहून अधिकारीही हैराण झाले. या पाकिटांमध्ये एक्सपायरी डेट उलटून गेलेले आणि असुरक्षित पद्धतीने पॅकिंग केलेले कंडोमही होते.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कंडोम हे नैसर्गिक रबरापासून बनवण्यात येतात. ते कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संक्रमणाला रोखण्यासाठी योग्य असतात. पण बनावट कंडोममध्ये अनैसर्गिक घटकांचा वापर केलेला असतो. त्यामुळे ते त्वचेला हानी पोहोचवतात शिवाय लैंगिक आजार रोखण्यासाठीही उपयुक्त नसतात.