
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तामलवाडी टोलनाक्याजवळ गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱया ट्रकला अचानक आग लागली. ट्रकमधील सिलिंडरचे स्फोट होऊन ट्रक जळून खाक झाला. एकामागे एक सिलिंडरचे स्फोट होत असल्यामुळे घबराट पसरली होती. तर तामलवाडी गावकऱयांना सतर्क करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत ही आग विझविण्याचे काम चालू होते. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तामलवाडी टोलनाक्याजवळ सायंकाळच्या सुमारास गॅस सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक पेटला. ट्रकमधील गॅस टाक्यांचा स्फोट होऊ लागले. स्फोटाच्या आवाजामुळे जवळपास 10-12 मैलांवरील गावे हादरली होती. यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.































































