पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या उत्पन्नात वाढ, माघी यात्रेच्या कालावधीत 3 कोटींचे दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माघी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी तीन कोटींचे दान जमा झाले असून गतवर्षीपेक्षा यामध्ये 1 कोटी 31 लाख 68 हजार 688 रुपयाने वाढ झाली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या मार्फत माघ यात्रा 2020 मध्ये माघ शु 1 ते माघ शु.15 या कालावधीत तीन लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या कालावधीत भाविकांकडून प्राप्त होणाऱ्या निरनिराळ्या देणगी रक्कमा व अन्य मार्गाने समितीस एकूण 2 कोटी 90 लाख 26 हजार 579 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे यामध्ये परदेशी चलनाचा समावेश आहे.

देणगी उत्पन्नामध्ये श्री विठ्ठलाच्या चरणावर 19 लाख 22 हजार 207 रुपये, श्री रुक्मिणी मातेच्या चरणावर 5 लाख 58 हजार 302 रुपये, अन्नछत्र देणगी 2 लाख 11 हजार 476, पावती स्वरुपातील देणगी 50 लाख 725 रुपये, बुंदी लाडू प्रसाद विक्री 35 लाख 99 हजार 130 रुपये, राजगिरा लाडू विक्री 3 लाख 58 हजार रुपये, फोटो विक्री 66 हजार 125 रुपये, भक्तनिवास, वेदांन्ता, व्हिडीओकॉन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास 22 लाख 28 हजार 480 रुपये, नित्यपूजा 1 लाख 36 हजार रुपये, हुंडी पेटीमध्ये जमा 74 लाख 74 हजार 809 रुपये, परिवार देवता 14 लाक 96 हजार 174 रुपये, आॅनलाईन देणगी 17 लाख 31 हजार 322 रुपये व अन्य स्वरुपात 42 लाख 43 हजार 829 रुपयांचा समावेश आहे.

गतवर्षी याच कालावधीमध्ये 1 कोटी 58 लाख 57 हजार 891 रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी मंदिर समितीच्या उत्पन्नात 1 कोटी 31 लाख 68 हजार 688 रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.