सौदी अरेबियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसचा फटका आता जगातील कच्च्या तेलाच्या पुरवठय़ावरही दिसायला लागला आहे. जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियाने अनेक देशांना मार्चमध्ये पाठवण्यात येणाऱया तेल पुरवठय़ात मोठी घट केली आहे. रिफायनिंग कंपन्यांच्या तेल उत्पादनात घट झाल्यामुळे सौदीने हा निर्णय घेतल्याचे समजते.

‘अरामको’ या सौदी अरेबियातील सर्वात मोठय़ा तेल उत्पादक कंपनीने आधी मार्चसाठी आपल्या सेलिंग प्राइझमध्ये घट केली होती. आता त्याच महिन्यासाठी त्यांनी पुरवठाही घटविण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्यामागे चीनमधील कोरोना व्हायरसचा प्रकोप हेच प्रमुख कारण आहे, असे या कंपनीशी संबंधित एका सूत्राने सांगितले. या कंपनीकडून चीनला कच्च्या तेलाचा 10 टक्के कमी पुरवठा केला जाण्याची शक्यताही या सूत्राने पुढे व्यक्त केली आहे.