दिल्ली निवडणूक निकालानंतर राजदीप सरदेसाईंचा स्टुडिओत डान्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्तेची ‘हॅटट्रिक’ साजरी झाली. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडे टीव्हीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई चक्क स्टुडिओतच नाचले. त्यांच्या डान्सचा हा व्हिडीओ व्हायरल होताच दुसरे टीव्ही पत्रकार ‘न्यूज 18’चे अमिष देवगन यांनी राजदीप यांना ट्रोल करीत त्यांच्या पत्रकारितेवर निशाणा साधला. त्यानंतर देवगन यांच्यावर पलटवार करताना ‘पुढच्या वेळेला नाचेन आणि गाणीसुद्धा म्हणेन’ असे प्रत्युत्तर टिव्ट करून दिले. या प्रकारानंतर दोन्ही टीव्ही पत्रकारांच्या चाहत्यांनी त्यांना ट्रोल करीत आपली बाजू मांडली. या ‘ट्रोलिंग’ने टीव्ही पत्रकारांत आपसातच जुंपली असल्याचे स्पष्ट झाले.

राजदीप यांच्या व्हिडीओवर भाष्य करताना आमिष देवगन यांनी लिहिले आहे की, दिल्ली निकालानंतर स्टुडिओत पत्रकारांच्या डान्सचे आयोजन तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि निःपक्षपातीपणाचा टेंभा मिरवणाऱया पत्रकारांनी केले आहे आणि हे पत्रकारितेवर भाष्य करतात. यातूनच 30 वर्षांची यांची मानसिकता दिसते आहे. त्यावर राजदीप यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून उत्तर दिले की, हो सर, माझ्या रॉकस्टार पोलस्टारसाठी आम्ही पत्रकार नाचून आनंदोत्सव साजरा करीत आहोत. पुढच्या वेळेस आम्ही नाचू व गाणेदेखील गाऊ. अमिशजी, तुमचे काय? तुम्ही पत्रकारितेच्या नावावर घोर कलंक आहात. तुम्ही तुमच्या मालकाच्या तालावर नाचता, गाता आणि समाजात ‘द्वेष’ पसरवण्याचे काम करता.

‘पहले कोठी, फिर कोठा’ – विवेक अग्निहोत्री

आमिश देवगन यांच्यासोबतच बॉलीवूड डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी राजदीप सरदेसाई यांचा व्हिडीओ ट्रोल करताना लिहिले की, ‘पहले कोठी, फिर कोठा, देखो मिडियाने पत्रकारिता को ठोका.