चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्यातील मूल तालुक्यातील मोरवाही गावात शेतात लाख खोदणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून महिलेला ठार केले. महिलेचे नाव सरिता पाल (32) असून ती मोरवाही येथील आहे. सरिता सकाळी लाख खोदणी करायला शेतात गेल्या होत्या. दबा धरून बसलेल्या वाघाने दुपारी काम करीत असलेल्या सरिता पाल यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना 7 वर्षाची मुलगी व 11 वर्षाचा मुलगा आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.