परदेशी देणग्यांवर खातात बिर्याणी, भाजप नेत्याचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाहीन बागेतील महिला अडाणी असून परदेशी देणग्यांवर त्या बिर्याणी खातात असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार दिलीप घोष यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून घोष यांनी शाहीन बागेतील आंदोलनकर्त्या महिलांना सातत्याने लक्ष्य केले आहे.

दिल्लीच्या शाहीन बागेत गेली दोन महिने मुस्लिम महिला CAA विरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दिलीप घोष यांनी नेहमीच खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. आता घोष म्हणाले की, गरीब आणि निरक्षर महिला, पुरुष आंदोलनाला बसले आहेत. त्यांना जी बिर्याणी दिली जात आहे ती परदेशाहून मिळलेल्या देणग्यांतून विकत घेतली आहे.” दिल्लीचे शाहीन बाग असो किंवा कोलकाताचे पार्क सर्कस असो सर्व ठिकाणी एकच स्थिती असल्याचे घोष यांनी सांगितले. तर माकप नेत्या वृंदा करात आणि काँग्रेस नेते पी चिंदबर सारखी लोक या गर्दीत सामील होतात. काही अशिक्षित महिला आपल्या मांडीवर लहान मुलांना घेऊन बसल्या आहेत असेही घोष म्हणाले.