1 / 7
आज महाशिवरात्रीच्या दिवशी देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. देशभरातल्या प्रत्येक शिवमंदिरात आज उत्सव साजरा होत आहे. पण, महाशिवरात्र साजरी करणारा हिंदुस्थान हा एकमेव देश नाही. हिंदुस्थानव्यतिरिक्त अन्य देशांमध्येही शिवमंदिरं आहेत आणि तिथेही असाच उत्साह आणि उत्सव पाहायला मिळतो.
श्रीलंका येथेही भगवान शंकराची आराधना केली जाते. येथील मुनेश्वरम येथे एक द्रविड शैलीतलं शिवमंदिर आहे. असं म्हणतात की प्रभु श्रीरामांनी इथेच शिवशंकराची आराधना केली होती.
मलेशिया येथील अरुलमिगु श्रीराजा कली अम्मन मंदिर येथेही शिवशंकराची पूजा केली जाते. हे मंदिर तुलनेने नवीन असलं तरीही या मंदिरात शिवशंकराची एक सुंदर मूर्ती आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे भक्त मोठ्या संख्येने भगवान शंकराच्या दर्शनाला येतात.
स्वित्झर्लंड येथील ज्युरिख येथे शिवा टेम्पल नावाने एक छोटेखानी मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात शिवलिंगाच्या पाठी अर्धनारीनटेश्वराची प्रतिमा आहे. विशेष म्हणजे इथे महाशिवरात्रीसह अन्य अनेक सण उत्साहाने साजरे होतात.


























































